दर्शनमात्रे !
मी काही देव-देवळे करणा-यातला नाही. जरी देवावर पूर्ण श्रद्धा असली तरीही त्यासाठी देवळात उपस्थिती लावायची गरज नसते अशा मतांचा मी आहे. देवळात जातोच क्वचित. अगदि प्रसिद्ध देवस्थानी जरी गेलो तरिही जर दर्शनासाठी जर लांब रांग असेल (जी नेहमी असतेच) तर बाहेरूनच देवाला नमस्कार करणार ! पण माझे अनेक मित्र माझ्या बरोबर विरुद्ध. म्हणजे संकष्टीला उपवास, गुरुवारी मांसाहार निषिद्ध, शनीवारी मारुती, २१ वेळा अथर्वशिर्ष, पूजा-अर्चा इ. इ. इ करणारे. काही जण तर रोज न चुकता कुठ्ल्या तरी देवळात जाणारे. बरं यातले बहुतेक सर्व Engineers किंवा MBA. मी या मित्रांच्या धार्मिक भावनांची भरपूर मजा उडवतो. "ईशावास्यं इदम सर्वम' हे जर खर असेल, तर देव सर्वत्रच भरला आहे. मग देवळात गेल काय न गेलं काय? मनात श्रद्धा असली पाहिजे.
तरीही या लोकांबद्दल मला एक प्रकारचे कुतुहल वाटत आले आहे. लोक इतके उपचारांद्द्ल जागरुक का असतात? सर्व कर्म-कांडे, षोडोपचार का करतात. केवळ उपचार म्हणून की त्यातून त्यांना खरोखरच काही समाधान लाभते ? दर वर्षी लाखो नव्हे कोट्यावधी लोक अमरनाथ, सबरीमलाई, आणि पंढरपूरच्या यात्रा करतात. त्यातले सगळेच काही हौशे, नवशे आणि गवशे नसतात. दोन मिनिटाच्या दर्शनासाठी एवढे शाररिक कष्ट कसे करू शकतात ? मी या वर खूप विचार केला. पण काही लक्षात येइना.
काही दिवसांपूर्वी शिकागोजवळ्च्या बालाजी मंदिरात गेलो होतो. योगायोगानी त्या दिवशी महाशिवरात्री होती. मंदिरा दक्षिणात्य घाटाचे होते आणि त्यामुळे जवळजवळ ३ तास गाभारा झाकून ठेवून मिरवणुका, भजने, आरत्या वगैरे चालु होत्या. मला तर त्या सर्व गोष्टींचा कंटाळा आला. पण तिथे जमलेले शेकडो भाविक त्या सर्व कर्मकांडात आनंदाने भाग घेत होते. अक्षरश: डोळ्यात प्राण आणून गाभारा उघडण्याची वाट पहात होते. एकदाचा गाभारा उघडला आणि शिवपिंडीचे दर्शन घेताना त्या भाविकांच्या चेह-यावरून ओसंडुन वाहणारे समाधान केवळ अविस्मरणीय ! मंदिरात जमलेले ते उच्चशिक्षाविभुषित भाविक, हजारो डॉलर्स कमावणारे. पण एक अंतरिक ऒढ त्यांना तेथे खेचून आली होती. ईश्वरासमोर त्यांचे डॉलर्स, डिग-या ते क्षणभर का होईना विसरले होते.
मग मला एकदम उत्तर मिळाले : त्या २ मिनिटांमध्ये अगणित क्षणांचे कष्ट आणि प्रापंचिक व्याप विसरवण्याची शक्ती आहे आणि त्या २ मिनिटांमध्ये अगणित क्षणांचे आणखी कष्ट आणि व्याप सहन करण्याची शक्ती मिळते. त्यांना मिळते दर्शनमात्रे मला मिळते स्मरणेमात्रे !
माझी मते अजूनही बदललेली नाहित. अजुनही देवळात गर्दी असेल तर मी बाहेरूनच नमस्कार करेन.
पण मी आता इतरांना समजू शकतो !

3 Comments:
मराठी ब्लॉगविश्वात स्वागत आणि शुभेच्छा!
नोंद आवडली. कुठल्यातरी गोष्टीवर, कल्पनेवर किंवा व्यक्तीवर श्रद्धा असते, असावी हे महत्त्वाचे. त्या श्रद्धेचं रूप काही का असेना. आणि तितकंच महत्त्वाचं इतरांच्या श्रद्धेचा आदर करणं. मग ती तुम्हाला पटो अथवा न पटो!
सुमेधाशी सहमत.
आत्ता कोनहळा पण मराठीत ल्हीवायला काही चिंता होता नाही...माझा दोस्ताना एक साइट संगितली ती आहे www.quillpad.in/marathi हेच्यात तुम्ही जर
मराठी इंग्रजीत ल्हिवल्या तर ते त्याला मराठीत बदलते..वापरुन पहा तुम्ही पण...
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home