Wednesday, March 23, 2011

The Trail of a Flavor


Raghavendra Nabar was born in an orthodox affluent Hindu Kaarvaari Saarswaat family. His father was Class I gazetteer officer in the department of revenues under British Raj. His mother was a religious woman. He was raised in a joint family of 17 people. Being the only child of his parents, Raghavendra enjoyed a comfortable childhood.

Raghavendra’s family moved to Bombay when he was 7. Soon he found himself in a new exciting multicultural society that was a world different to the rural coastal village he knew. Raghavendra developed his taste for different cuisines although could never try his culinary skills in an orthodox household where cooking by a male was still considered a taboo.

In 1962, Raghavendra obtained Bachelor of Science in chemistry from University of Bombay with gold medal and started reading analytical chemistry at Mithibai College. Next year he was selected for a prestigious American scholarship to study and research at Massachusetts Institute of Technology (MIT). Raghavendra earned his masters and then PHD in chemical engineering from MIT and was immediately hired by The Standard Oil Company of New Jersey (now ExxonMobil).

Raghavendra worked in various countries on various oil fields all over the world including 4 years in North Africa and then 7 years in Italy where he met his life partner Delanna. The couple was blessed with two boys Vincentio and Otello and a beautiful girl Esta. After years of travel, they finally settled in southern Sicily when Raghavendra accepted a research job in ENI SA.

Relaxed and blasé Sicily compelled Raghavendra to surface his old passions that were damped in his heart for decades. A bright student of analytical chemistry, avid reader, world traveller, and  a connoisseur, Raghavendra had perfect mix of traits needed to become an expert chef. Raghavendra soon started experimenting his culinary skills and treating his family, neighbors, and friends. Everyone who had his hospitality relished the delicacies like Ciopianno Scampi, Spinach Aricini, La Siciliana Risottio, all made with his unforgettable signature spicy pasta sauce. With Delanna’s constant encouragements Raghavendra started marketing his pasta sauce under the brand name Ragu, name only Delanna used to call him. Product instantly became a local hit soon regional, national and even worldwide. It’s robust yet tangy flavor delighted millions and with millions of kilos of sales and dozens of flavors, Ragu crossed boundaries of race, religion, language, and nationalities just in few years.

Raghavendra retired selling his recipes to a multinational corporation for an unknown sum which is guestimated in millions of dollars. In their mid-seventies Raghavendra and Delanna today operate a small seaside restaurant in a tiny village in remote Mazara del Vello. They still enjoy sharing their adventures from Burma, Algeria and Upper Bolivia with their guests and treating them with their original Pasta Sauce recipe they never sold – a taste that awakens his childhood memories of his costal village and zesty Solkadhi !


Sunday, July 30, 2006

इथका, NY

इथका - न्यूयॉर्क राज्याच्या उत्तरमध्येला वसलेले एक सर्वांगसुंदर गाव. डोंगरकुसातल्या गावाला निसर्गाने भरभरून तर लाभला आहेच. पण मानवनेही या निसर्गावर दया दाखवून तो अबाधित राखला आहे. हे गाव वसले आहे डोंगरउतारावर. दरीच्या पायथ्याला आहे कयुगा नावाचे विस्तिर्ण सरोवर. इथकाला जर तुम्ही उत्तरेकडून आलात तर रस्ता वळणं वळणं घेत, चढ - उतार करत तुम्हाला छोट्या-छोट्या शेतातून घेऊन येईल. शेतं संपून किर्र झाडी चालु होते. झाडी अचानक संपते आणि समोर येतो कयुगाचा विस्तिर्ण जलाशय. जलाशयाच्या पलिकडे माथ्यावर दिसतो इथकाचा प्राण असलेल्या कॉर्नेल विधापॊठाचा उत्तुंग क्लॉक टॉवर !


कॉर्नेल विद्यापीठ - १८६५ साली स्थापन झालेले, प्रतिष्ठित Ivy League चा सदस्य असलेले, अमेरिकेतल्या सगळ्यात आघाडीतल्या विद्यापीठंपैकी एक. विद्यापीठाचे आवार केवळ विस्तिर्णच नाही तर अवाढव्य आहे. विद्यापीठाच्या बरयाचशा इमारती गॉथिक किंवा व्हिक्टोरियन शैलीतल्या आहेत. विद्यापीठाचे स्वत:चे golf course, botanical garden आणि plantation आहे. डोंगरमाथ्यावरच्या या planatation चा विस्तार आहे फ्क्त २९०० एकर (म्हणजे पुणे विद्यापीठाच्या साधारण ७ पट !)

गावाला नदी वगैरे नाहीच. एक ऒढा मात्र वाह्तो. याचे नाव Fall Creek. अर्धे गाव डोंगरमथ्यावर आणि अर्धे गाव डोंगर-उतारावर असल्यामुळे हा ऒढा रमतगमत तर कधी उड्या मारत वहातो. गावाबाहेर याच्यावर दोन- चार धबधबे बनले आहेत. आजुबाजुची दरी-खोरी अफाट रानांनी भरली आहेत.


मी इथकाला ४ वेळा गेलो. इथकाचे सौदर्य मी Summer, Fall, Winter आणि Spring अशा ४ ही ऋतुत अनुभवले आहे. प्रत्येक ऋतुत इथकाचे रुप वेगळेच भासते. रणरनीत उन्हाळ्यात सारे इथका ऒस पडलेले असते. Fall मधे झाडांच्या पानांचे रंग बदलून लाल, पिवळे, भगवे, जांभळे होतात. विशेषत: कयुगा सरोवाराच्या भोवतालीची दरी तर संपूर्ण रंगेबिरंगी झालेली असते. हिवाळा तर भयानकच. सोसाट्याने वाहणारा वारा हिमकणांचे नुसते वार करत असतो. कुठे हिरवळीचे पातेसुद्धा दिसत नाही. हिवाळ्याचे वर्णन केवळ "भीषण सुंदर" या एकाच शब्दाने करता येईल. ४ महिने हा अनुभव घेतल्यावर मग Spring येतो. पुन्हा गवत दिसायला लागते. झाडांना परत पालवी फुटते. पुन्हा एकदा उत्साहाला उधाण येते.

डाउन-टाऊन मध्ये Ithaca Commons नावाचा एक छानदार ओपन मॉल आहे. दोनही बाजुला त-हेत-हेच्या वस्तु विकणारी छोटी-छोटी दुकाने, विविध प्रकारची उपहारग्रुहे आणि मधे एक चांगली रुंद फरसबंदी केलेली जागा. संध्याकाळच्या वेळेला गप्पा छाटायला किंवा वेळ घालवायला एक उत्तम जागा. या बाजारात कायम कोणते तरी Festivals चालु असतात. एकदा सफरचंदाचे विविध पदार्थ आणि वस्तु केलेला Apple Festival आठवतो.

या गावाला एक प्रकारचा घरंदाजपणा आहे. कुठे जरासाही बकालपणा नाही. पण उगचच चमचमाट, लखलखाट किंवा बडेजावही नाही. छोटी-छोटी टुमदार घरे, दुतर्फा गर्द झाडी असलेले वळणावळणाचे रस्ते, Fall Creek वरचे चिमुकले पुल. एखाद्या परिकथेत शोभावे असे गाव. रात्रीच्या वेळी जेव्हा सर्वत्र सामसुम होते तेव्हा घरांभोवतीची विचित्र सजावट, झाडांच्या सावल्या, आणि निरव शांतता यामुळे हेच गाव अतिशय गुढ-रम्यही वाटते.

गावातले रहिवासी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ! त्यातही आंतराष्टीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय. भारतीय, चायनीज, कोरियन, क्युबन, थाई अशा उपहारग्रुहांची रेलचेल आहे. आणि कदाचित यामुळेच गावातले वातावरण बरेचसे उदारमतवादी आहे. या उदारमतवादाची झलक इथकाच्या भिंतींवर, व्रुत्तपत्रांतून आणि लोकांशी बोलताना सारखी जाणवते. किंबहुना अमेरिकेतील सर्वात उदारमतवादी गावात इथकाची गणना होते. इथकाकरांच्या विरोधामुळेच इथकातून Highway नेण्याची योजना बासनात गुंडाळावी लागली. गेली काही वर्षे इथकावासी WalMart विरुध्द लढा देत आहेत. जागरुक रहिवासी आणि उदारमतवादी वातावारण यामुळे इथकाला अमेरिकेतील "Most Enlightened Town" असा बहुमान प्राप्त झाला आहे.

मी गेल्या वर्षभरात इथकाला जवळ जवळ एक-दीड महिना राहिलो आहे. प्रत्येक सुट्टीत ताईने केलेल्या भजांवर किंवा राहुलनी केलेल्या Chicken Wings वर आडवा हात मारत, ध्रुवशी खेळताना दिवस कसा जातो ते कळतही नाही.

इथका हे मी अमेरिकेतले पाहिलेले पहिले गाव आणि आत्तापर्यंत सगळ्यात आवडलेले पण!



(कयुगा सरोवर - उन्हाळ्यातील एक आळसावलेली संध्याकाळ)






(कॉर्नेलमधला सेज हॉल - बाहेरून किल्लेवजा दिसणारी ही वास्तु आतून पूर्णपणे अधुनीक आहे. )

Saturday, May 27, 2006

लिफ्ट-यात्रा : एक भयकथा !

मला लहानपणापासूनच लिफ्ट या प्रकाराबाबत एक भिती वाटत आली आहे. कदाचित हा बंद जागेच्या भितीचा सौम्य प्रकार (Mild Claustrophobia) असेल. विशेषत: काळोख्या, सरकारी इमारतीत मी लिफ्ट्चा वापर टाळतोच ! विज गेली आणि बंद पडली तर काय करा? शिवाय या सरकारी लिफ्टस (शासकीय भाषेत उर्ध्व-वाहक की काहिसे) वापराचा परवाना हा महाराष्ट्र राज्य स्थापले गेले त्या काळात मिळालेला असतो. आपण अडकणार आणि नेमक्या त्याच वेळेला ऒळीने ४-५ दिवसांच्या सार्वजनिक सुट्टया यायच्या, दोन - पाच माफक संप व्हायचे आणि आपण तेथेच. त्यापेक्षा जिना बरा. तेथे गुटक्याच्या पिचका-यांची भित्तीचित्तेही पहायला मिळतात. पण मी चकचकीत इमारतीतसुद्धा वॉचमन आणि मोबाइल आहे याची खात्री करूनच लिफ्टमधे प्रवेश करतो.

ही गोष्ट आहे गेल्या ऑगस्ट मधली. मी न्यूयॉर्क राज्यातल्या माझ्या विद्यापीठाच्या गावी पोहोचतच होतो. तिथला एक जुना-जाणता भारतीय विद्यार्थी आम्हाला डाउन टाउन दाखवायला घेऊन गेला. मग घरही दाखवतो म्हणून डाउन टाउनच्या शेवटी असलेल्या एका बकाल भागात तो घेऊन आला. तेथील सगळ्यात पडिक इमारतीत त्याचा अपार्टमेंट होता. त्या इमारतीचे वर्णन निदान मला तरी करता येणार नाही. बाहेरून पाहिले तर तेथे कोणी राह्त असेल असे वाटतही नव्हते. आतही काळोख, काळपट भिंती, लाकडाची जमीन कर् - कर् वाजणारी, काहीशी कुबट हवा अस भयाण वातावरण. तो मित्र म्हणाला की त्या इमारतीमधे धडधाकट असे तो आणि त्याचे रुम-मेट्टस एवढेच. बाकी सगळे म्हातारे-कोतारे, आजारी आणि काहीही काम-धंदा नसलेले राहतात. (Matrix चित्रपट बहुतेक सगळ्यांनी पाहिला असेल. निऒ ऒरॅकलला भेटायला जातो ती इमारत आठवा. त्याहून वाईट ती जागा होती)

तिस-या मजल्यावर जायचे होते. चूक आमचीच होती. ४ जणांच्या लिफ्टमधे ८ जण घुसलो. तिस-या मजल्याचे बटण दाबले. घुईर् - घुईर् असला कसला तरी विचित्र आवाज करत ती लिफ्ट संथपणे वर जायला लागली. 'अमेरिकेतला पहिला लिफ्ट प्रवास' - कोणीतरी पचकला. लिफ्ट वर जात होती पण मला काही तिचे लक्षण काही खरे वाटेन. (कदाचित तो माझा तथाकथित Claustrophobia असेल). पहिला मजला गेला, दुसरा गेला आणि दरवाजा उघडायच्या आतच कोणीतरी open चे बटण दाबले. जोराचा ब्रेक दाबल्यावर येतो तसा आवाज होऊन ती लिफ्ट थांबली. लिफ्ट थांबली पण दरवाजा काही उघडला नाही. परत open चे बटण दाबले पण छे ! लिफ्ट बंद पडली आहे हे लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही.

पहिली चार-पाच मिनिटे मजेत गेली. आरडा-ऒरडा झाला. 'आमच्या लिफ्टस ब-या वगैरे गोष्टी झाल्या. पण मग हळु ह्ळु परिस्थिती लक्षात यायला लागली - 'आपण एका अपरिचित देशातल्या अपरिचित गावातल्या जवळ जवळ वावर नसलेल्या इमारतीतल्या लिफ्टमधे अडकलो आहोत'. सगळी बटणे दाबून पाहिली. काहीही फरक नाही. मग हाताने दरवाजा उघडाचे प्रकार झाले. तो भक्क्म दरवाजा उत्तम दर्जाच्या ऒक लाकडापासून बनवलेला - ढिम्म सुद्धा हलला नाही. मग भिंतीवर थडा-थडा लाथा मारल्या. तो लाकडी सांगाडा तेवढा गदा-गदा हलला. तिथे एक emergency बेल होती. ती दाबली पण कसलाच आवाज होईना. पुन्हा एकदा भिंतीवर थडा-थडा लाथा झाल्या.

त्या मित्राने मोठ्या ऎटीत त्याचा cell phone काढला. पण नशिब पहा - बॅटरी मॄतप्राय झालेली. आत अडकून आता जवळ-जवळ ८-१० मिनिटे होत आली. त्या लिफ्टला Exhaust Fan नव्हता. एवढच काय साधा झरोका पण नव्हता. संपुर्णपणे बंदिस्त असा तो लाकडी डबा होता. आता आतली हवा बाहेर जात नव्हती की बाहेरून आत शुद्ध हवा आत येत नव्हती. जीव गुदमरायला सुरवात झाली. हॅ - हॅ कराणारे पण आता रडकुंडिला आले. काय करावे काही सुचेना. या लाकडी पेटीत आपली जिवंतपणे समाधी हे निश्तित !

आमच्यापैकी एकाकडे भारतातला Mobile Phone होता. प्रवासात बोलता यावे म्हणून त्याने International Roaming घेतले होते. आमच्या सुदैवाने त्यात ४०-५० रुपयांचा charge बाकी होता. प्रयत्न्न केला. घरमालकांना फोन केला. घरमालक स्लोवेनिया की अझरबैझान कुठले तरी स्थलांतरीत होते. माझा मित्र त्याच्या खास Call Center मधे कमावलेल्या अमेरिकन उच्चारात लिफ्ट बंद पडली आहे वगैरे सांगायला लागला. घरमालकांच्या पत्नीने फोन घेतला असावा. तिला काहीच कळेना. तिचे बोलणे आम्हाला कळेना. इकडे charge संपायला येतोय. शेवटी स्पष्ट भारतीय उच्चारात "Elevator is not working and we are in elevator. Please help us" असे सांगीतले. त्यांना ते कळले. We will reach there in 5 minutes हे शब्द कानावर आले असे वाटले.

पुढे काय ? आम्ही विचार करायला लागलो. दुसरे काही हातात नव्हतेच. नेमके काय आठवत नाही पण छताची पट्टी काढावी अशा काही तरी योजना होत्या. यात किती वेळ गेला काही कळलेच नाही. पण निदान कोणीतरी मदतीला येत आहे हा विचार त्या क्षणी तारक ठरला.

तेवढ्यात कुठुन तरी एक अस्पष्टसा आवाज ऎकु आला - "Hello, Anybody there ? " आणि सर्व प्रथम जिवंतपणे बाहेर पडण्याची आशा पल्लवीत झाली. ५ मिनिटात तुम्ही बाहेर याल असा त्या व्यक्तीने धीर दिला. पण आमचे दुर्दैव काही संपले नव्हते. दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न्नात किल्ली Duct मधे पडली. मग दुसरी किल्ली आणली गेली. एकदाचा तो दरवाजा उघडला गेला आणि आम्ही लिफ्टच्या त्या कराल जबड्यातून बाहेर आलो.

बाहेर आलो आणि ऑक्सिजनला 'प्राणवायू' का म्हणतात याची जाणीव झाली. छातीत हवा भरली. घरमालक काकांनी '४ जणांच्या लिफ्टमध्ये ८ जणांनी जावू नये, २ मिनिटे वाट पहावी' वगैरे उपदेश केला आणि आपत्कालीन ९११ फोन केला नाही म्हणून आमचेच आभार मानले. आम्हीही घरमालक काका आणि त्यांच्या सहाय्यकाचे आभार मानले, दिलगिरी व्यक्त केली. घरात येउन घटाघटा पाणी प्यायलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. मग ५ मिनिटांनी (अर्थातच जिन्यानी) खाली आलो. गाडीजवळ आलो तेव्हा कोणीतरी जोक मारला - किल्ली वरच राहिली. २ मिनिटात घेवून येउ. ३ रा मजला आहे पण लिफ्ट आहे. गेल्या ३०-४० मिनीटातला आमच्या मनावरचा ताण, भिती सगळ काही एका हास्यलोटाबरोबर बाहेर आले.
आता लिहिताना गंमत वाटते पण त्या वेळेची आमची बोबडीच वळली होती. त्या नंतर त्या इमारतीत मी ३-४ वेळा गेलो पण कधीही लिफ्ट वापरली नाही. लिफ्ट बद्द्लची माझी भिती खोटी नव्हती एवढे सिद्ध झाले हाच काय तो चांगला भाग !

(सत्यकथा - किंचितही अतिशयोक्ती नाही !)

Thursday, May 18, 2006

दर्शनमात्रे !

मी काही देव-देवळे करणा-यातला नाही. जरी देवावर पूर्ण श्रद्धा असली तरीही त्यासाठी देवळात उपस्थिती लावायची गरज नसते अशा मतांचा मी आहे. देवळात जातोच क्वचित. अगदि प्रसिद्ध देवस्थानी जरी गेलो तरिही जर दर्शनासाठी जर लांब रांग असेल (जी नेहमी असतेच) तर बाहेरूनच देवाला नमस्कार करणार ! पण माझे अनेक मित्र माझ्या बरोबर विरुद्ध. म्हणजे संकष्टीला उपवास, गुरुवारी मांसाहार निषिद्ध, शनीवारी मारुती, २१ वेळा अथर्वशिर्ष, पूजा-अर्चा इ. इ. इ करणारे. काही जण तर रोज न चुकता कुठ्ल्या तरी देवळात जाणारे. बरं यातले बहुतेक सर्व Engineers किंवा MBA. मी या मित्रांच्या धार्मिक भावनांची भरपूर मजा उडवतो. "ईशावास्यं इदम सर्वम' हे जर खर असेल, तर देव सर्वत्रच भरला आहे. मग देवळात गेल काय न गेलं काय? मनात श्रद्धा असली पाहिजे.

तरीही या लोकांबद्दल मला एक प्रकारचे कुतुहल वाटत आले आहे. लोक इतके उपचारांद्द्ल जागरुक का असतात? सर्व कर्म-कांडे, षोडोपचार का करतात. केवळ उपचार म्हणून की त्यातून त्यांना खरोखरच काही समाधान लाभते ? दर वर्षी लाखो नव्हे कोट्यावधी लोक अमरनाथ, सबरीमलाई, आणि पंढरपूरच्या यात्रा करतात. त्यातले सगळेच काही हौशे, नवशे आणि गवशे नसतात. दोन मिनिटाच्या दर्शनासाठी एवढे शाररिक कष्ट कसे करू शकतात ? मी या वर खूप विचार केला. पण काही लक्षात येइना.

काही दिवसांपूर्वी शिकागोजवळ्च्या बालाजी मंदिरात गेलो होतो. योगायोगानी त्या दिवशी महाशिवरात्री होती. मंदिरा दक्षिणात्य घाटाचे होते आणि त्यामुळे जवळजवळ ३ तास गाभारा झाकून ठेवून मिरवणुका, भजने, आरत्या वगैरे चालु होत्या. मला तर त्या सर्व गोष्टींचा कंटाळा आला. पण तिथे जमलेले शेकडो भाविक त्या सर्व कर्मकांडात आनंदाने भाग घेत होते. अक्षरश: डोळ्यात प्राण आणून गाभारा उघडण्याची वाट पहात होते. एकदाचा गाभारा उघडला आणि शिवपिंडीचे दर्शन घेताना त्या भाविकांच्या चेह-यावरून ओसंडुन वाहणारे समाधान केवळ अविस्मरणीय ! मंदिरात जमलेले ते उच्चशिक्षाविभुषित भाविक, हजारो डॉलर्स कमावणारे. पण एक अंतरिक ऒढ त्यांना तेथे खेचून आली होती. ईश्वरासमोर त्यांचे डॉलर्स, डिग-या ते क्षणभर का होईना विसरले होते.

मग मला एकदम उत्तर मिळाले : त्या २ मिनिटांमध्ये अगणित क्षणांचे कष्ट आणि प्रापंचिक व्याप विसरवण्याची शक्ती आहे आणि त्या २ मिनिटांमध्ये अगणित क्षणांचे आणखी कष्ट आणि व्याप सहन करण्याची शक्ती मिळते. त्यांना मिळते दर्शनमात्रे मला मिळते स्मरणेमात्रे !

माझी मते अजूनही बदललेली नाहित. अजुनही देवळात गर्दी असेल तर मी बाहेरूनच नमस्कार करेन.

पण मी आता इतरांना समजू शकतो !

Wednesday, May 17, 2006

बहुत काय लिहिणे ?

अनेक दिवसांनी मराठीत लिहित आहे. गेले काही दिवस मराठी लिहिणे तर सोडाच पण मराठी बोलणेही विसरत चाललो आहे. ("आज मातृभाषेला विसरलात उद्या स्वत:ची ओळखही विसराल !!" इ. इ. इ. बोलायची सुवर्णसंधी ! ) पण इथे माझ्या गावात एकही मराठी भाषक नाही. त्यामुळे फोनवर घरच्यांशी किंवा मित्रांशी बोलतो तेवढच काय ते ! गेल्या महिन्यात Ohio राज्यातल्या Cleveland गावी एका conference साठी गेलो होतो, तेथे पुण्यात काम करणारे जोशी नावाचे एक गृह्स्थ भेटले. तेव्हा कित्येक दिवसांनी मराठीत प्रत्यक्ष बोलता आले.

आता या Blog मुळे निदान मराठी ' लिहिणे ' विसणार नाही ही अपेक्षा !

बहुत काय लिहिणे ?